काँग्रेसला धक्का, ‘या’ जिल्हाध्यक्षाचा शिवसेनेत प्रवेश!

काँग्रेसला धक्का, ‘या’ जिल्हाध्यक्षाचा शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून
उस्मानाबादमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.प्रशांत चेडे यांना मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता चेडे यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अजूनही काही नेते शिवसेना-भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. साताय्रातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु उदयनराजे यांनी मात्र याबाबत आपली भूमिका अजून जाहीर केली नाही. त्यामुळे ते भाजपात जाणार की नाही हे अजून अस्पष्ट आहे.

COMMENTS