बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुमीपूजन

बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुमीपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना 32 टक्के जमिनीवर विकास करणार असून मुंबईच्या पुनर्विकासाचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर बीडीडीची जमीन ही सोन्याचा तुकडा असून बीडीडीच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा होता असेही सांगितले. हे काम आधी इच्छाशक्तीच्या अभावामुळे झाले नाही असा टोलाही त्यांनी यावेळी काँग्रेस – राष्ट्रवादीला लगावला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वरळीच्या जांबोरी मैदानात भव्य सभेच्या माध्यमातून भूमिपूजन करण्यात आले.

अडीच वर्षांत जलदगतीने पावले उचलत फडणवीस सरकारने प्रकल्पाची सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात डिलाईल रोड आणि नायगाव येथील चाळींचा पुनर्विकास केला जाणार असून, त्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती देखील करण्यात आली. डिलाईल रोड येथील चाळींचे काम शापूरजी अँड पालोनजी तर नायगाव येथील चाळींचा पुनर्विकास एल अँड टी या कंपनीमार्फत केला जाणार आहे. वरळी येथील प्रकल्पाची निविदा काढण्यात आली असून, लवकरच कंत्राटदाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे सध्या १६० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या चाळकऱ्यांना पुनर्विकासानंतर ५०० चौरस फुटांचे घर मोफत मिळणार आहे.

बीडीडी चाळींचा पुनर्विकास

#नायगाव, डिलाईल रोड, वरळी इथल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास

#१९४ चाळीत एकूण १६ हजार २०३ कुटुंबं

#सध्या १८० चौ.फूट घर, त्यांना ५०० चौरस फुटांचं घर

#रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी घरं मिळणार

#२३ मजली इमारती उभारणार

#विक्रीसाठी ६० मजली इमारती उभारणार

#उर्वरित जागेवर म्हाडा परवडणारी घरं बांधणार

COMMENTS