कर्जमुक्‍तीसाठी 1 मे पासून देशात छडक मोर्चा – खा. राजू शेट्टी

कर्जमुक्‍तीसाठी 1 मे पासून देशात छडक मोर्चा – खा. राजू शेट्टी

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्‍ती आणि सातबारा कोरा केल्याशिवाय शांत बसणार नाही. केवळ महाराष्ट्रपुरते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार नसून आता देशातील सर्वच शेतकऱ्यांचा सातबारा करण्यासाठी  1 मेपासून छडक मोर्चाचे आयोजन करणार असल्याची घोषणा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार खासदार राजू शेट्टी यांनी केले. देऊळगावराजे (ता. दौंड) येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

 
खासदार शेट्टी म्हणाले की, भाजप सरकारमुळे शेतकरी हवालदिल झाला असून पिकांना हमीभाव नाही. या सरकारला एका अटीवर पाठिंबा दिला तो फक्‍त स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा. परंतु आता या सरकारने सांगितले आहे की, हा आयोग लागू करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडायचे काम या सरकारनी केले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरी सुद्धा सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.

COMMENTS