पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील जागांसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. पुण्यातील 8 पैकी 4 विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी लढणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. तसेच 3 काँग्रेस,एका जागेवर मित्रपक्ष लढणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी हडपसर, पर्वती, खडकवासला, आणि वडगाव शेरी याठिकाणी निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस – कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसबा तर कोथरूडची जाग मित्रपक्षासाठी सोडण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच यासह सर्व जागा पुढील आठ दिवसात दोन्ही पक्षातील नेते एकत्रित बसून जाहीर करणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. परंतु भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार नाही, तोवर आम्ही उमेदवारांची यादी जाहीर करणार नसल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत.
COMMENTS