तीन तीन वर्षे यांच्या काकांनी कर्जमाफी दिलीय का ?, माझ्या काकानं एका झटक्यात  दिली – अजित पवार

तीन तीन वर्षे यांच्या काकांनी कर्जमाफी दिलीय का ?, माझ्या काकानं एका झटक्यात दिली – अजित पवार

अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 25 वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचा आमदार आहे काय केलं त्यांनी या मतदारसंघात ? या ठिकाणी विकास करण्यात ही माणसं कमी पडली आहेत.इकडे गावोगावी किती कोटीची कामे केली याचे बोर्ड लावले आहेत.
मी बारामतीमध्ये इतकी कामं केली. मी कधी बोर्ड लावला नाही. काम करणं ही आमची जबाबदारी आहे त्यासाठी कशाला बोर्ड लावता. ते बोर्डवरची रक्कम पाहून सामान्य माणसं विचार करतात 10 टक्क्यांनी किती झाले. हे सरकार दळभद्री सरकार आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल सरकार आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं ? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. कर्जत – जामखेड येथील सभेत बोलत होते.

दरम्यान तुमच्या महाजनादेश यात्रेत तुम्हाला का कडकनाथ कोंबड्या फेकून मारल्या जातात. का कडकनाथचे अंडे फेकून मारले.रोहित आमदार झाल्यानंतर इथे लगेच बारामती होणार नाही मात्र त्याची सुरुवात झालेली असेल. तीन तीन वर्षे यांच्या काकांनी कर्जमाफी दिलीय का ? माझ्या काकानं एका झटक्यात कर्जमाफी दिली देखील. 71 हजार कोटींची. एकदा रोहित पवारला आमदार करा जे 25 वर्षात झाले नाही ते 5 वर्षात विकास केल्याशिवाय राहणार नाही असं अवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं आहे.

COMMENTS