…तर मी निडणूक लढवणार नाही -उदयनराजे भोसले

…तर मी निडणूक लढवणार नाही -उदयनराजे भोसले

सातारा – विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यातील लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑक्टोबरला सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार असून विधानसभेसोबतच म्हणजेच 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोसले हे उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही. परंतु या निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. फक्त पवार साहेंबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. ते साताय्रात बोलत होते.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी आलं. यावेळी उदयनराजे म्हणाले शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. मी सांगतो ना, ते आदरणीय काल पण होते, आज पण आहेत आणि भविष्यातही असतील. ते जर उभे राहिले, तर मी फॉर्म भरणार नाही. फक्त एकच त्यांनी करावं, दिल्लीतला बंगला आहे ना, गाडी आहे, तेवढी मुभा आपल्याला द्यावी”, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

COMMENTS