विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर !

विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर !

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ही यादी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांबरोबर 288 जागा लढवणार आहोत. यादी फायनल करण्याचं काम सुरु असून पहिल्या यादीनंतर उर्वरित यादी 26 सप्टेंबरपूर्वी जाहीर केली जाणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. या यादीत पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 22 जागांचा समावेश आहे.

वंचित बहूजन आघाडीची पहिली यादी

दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर

बाळकृष्ण शंकर देसाई, कराड-दक्षिण

बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव

दीपक शामदिरे, कोथरुड

अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर

मिलिंद काची, कसबा पेठ

शहानवाला जब्बार शेख, भोसरी

शाकीर इसालाल तांबोळी, इस्लामपूर

किसन चव्हाण, पाथर्डी-शेवगाव

माधव कोहळे – राळेगाव

शेख शफी अब्दुल नबी शेख – जळगाव

लालसू नागोटी – अहेरी

मणियार राजासाब – लातूर शहर

अरुण जाधव, कर्जत-जामखेड

सुधीर शंकरराव पोतदार, औसा

चंद्रलाल वकटुजी मेश्राम – ब्रह्मपुरी

अरविंद सांडेकर – चिमूर

नंदकिशोर कुयटे – मोर्शी

अड आमोद बावने – वरोरा

अशोक विजय गायकवाड – कोपरगाव

COMMENTS