मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने शेवटच्या 6 महिन्यांमध्ये घेतलेल्या सर्व निर्णयांच्या फाईल्स त्यांनी मागवल्या आहेत.फडणवीस सरकारने त्यांच्या कार्यकाळात अखेरच्या 6 महिन्यांमध्ये घेतलेला प्रत्येक निर्णय बारकाईने तपासला जाणार आहे.उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागांना विविध योजना, निविदा प्रक्रिया, लहान, मोठे निर्णय याबाबतच्या फाईल्स देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यातील अनेक निर्णयांवर कुऱ्हाड पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याचंही काम सुरू आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या विकासाच्या दाव्यांचा फुगा फोडण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मागील काही दिवसांत एकामागून एक निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांनी आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई मेट्रोच्या आरे जंगलातील कारशेडला स्थगिती दिली आहे. यापूर्वीच त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेत असल्याचं सांगत श्वेतपत्रिका काढण्याचे संकेत दिले आहेत.
त्यानंतर आता फडणवीस सरकारने शेवटच्या 6 महिन्यांमध्ये घेतलेल्या सर्व निर्णयांच्या फाईल्स त्यांनी मागवल्या आहेत.त्यामुळे त्या अहवालातूनही ठाकरे फडणवीसांची कोंडी करणार असल्याचं दिसत आहेत.
COMMENTS