काॅंग्रेस अध्यक्ष निवडीसंदर्भात मॅरेथाॅन बैठक

काॅंग्रेस अध्यक्ष निवडीसंदर्भात मॅरेथाॅन बैठक

नवी दिल्ली: कॉंग्रेसमधील कलह आणि नेतृत्त्वावरील पेचाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेत्यांची शनिवारी बैठक झाली. सोनिया गांधीसोबत वरिष्ठ नेत्यांची बैठक ५ तासांहून अधिक वेळ चालली. या बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी आपली मते मांडली

काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी आज १० जनपथ येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत अशोक गहलोत, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, बीएस हुड्डा, पृथ्वीराज चव्हाण, अंबिका सोनी आणि पी. चिदम्बरम हे उपस्थित होते.

पक्षाच्या पुढील रणनितीवर चर्चा झाली. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या सद्यस्थितीबद्दल आणि त्यास बळकट करण्याच्या मार्गांवर चर्चा केली, अशी माहिती कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीनंतर दिली.

https://business.facebook.com/MahapoliticsMarathi/videos/828490894389589/

 

COMMENTS