आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत जाधव यांना फाशी नाही – पाकिस्तान

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत जाधव यांना फाशी नाही – पाकिस्तान

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशी देण्यात येणार नसल्याचे पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी स्पष्ट केलं आहे.

भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निकालाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला अंतिम निकाल येईपर्यंत स्थगिती दिली. मात्र, न्यायालयाच्या या निकालाच्या काही तासांतच पाकिस्तानने हा निकाल अमान्य असल्याचे सांगितले. त्यानंतर जाधवप्रकरणाबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात पाकिस्तान जाणार अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यानंतर आज अखेर पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नसल्याचे सांगितले.

COMMENTS