नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज दुसरा आणखी एक बदनामीचा खटला दाखल केला असून त्यात त्यांनी त्यांच्याकडून दहा कोटी रूपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या आधीही जेटली यांनी केजरीवाल आणि त्यांच्या पक्षातील पाच जणांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी केजरीवाल यांचे वकिल राम जेठमलानी यांनी जेटली यांची सुनावणी घेताना त्यांच्या विरोधात क्रुक म्हणजेच धोकेबाज असा शब्दप्रयोग वापरला होता. हा शब्दप्रयोग त्यांनी केजरीवालांच्या संमतीनेच वापरला असा दावा करून त्यांनी हा खटला दाखल केला आहे.
गेल्या बुधवारी केजरीवालांवरील बदनामीच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना राम जेठमलानी यांनी जेटली यांच्या विरोधात धोकेबाज असा शब्द वापरला होता. त्यावेळी जेटली यांनी त्यांना हा शब्द तुम्ही केजरीवालांच्या सांगण्यावरून वापरला आहात काय असा प्रश्न केला, त्यावर जेठमलानी यांनी न्यायाधिशांना सांगितले होते की होय मी त्यांच्याच सांगण्यावरून हा शब्दप्रयोग वापरीत आहे. त्या आधारावर त्यांनी हा खटला दाखल केला आहे. जेटली यांनी दिल्ली क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष असतानाच्या काळात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता. त्या संबंधात चौकशी करण्याचा आदेशहीं केजरीवालांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या जेटली यांनी केजरीवालांवर मुळ खटला दाखल केला आहे.
COMMENTS