काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या घरावर ईडीचे छापे

काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या घरावर ईडीचे छापे

काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या घरावर ईडीच्या अधिका-यांनी छापेमारी केली आहेझोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. . बाबा सिद्दीकी यांच्या घरासोबतच इतर पाच ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे.

मुंबईतील वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 100 कोटींच्या घोटाळ्यात बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या एक सहकारी बिल्डर रफीक मकबूल कुरेशी यांचा हात असल्याचा आरोप आहे. याच आरोपावरुन ही छापेमारी करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी आणि त्यांचा बिल्डर सहकारी रफीक मकबूल कुरेशी यांच्या एकूण 5 ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे.

वांद्रे येथील झोपडपट्टी विकासाच्या नावाखाली घोटाळा केल्याचा आरोप बाबा सिद्दीकी आणि बिल्डर रफीक मकबूल कुरेशी  या दोघांवर आहे. बनावट कागदपत्र बनवून पैसे हडपल्याचा आरोप या दोघांवर करण्यात येत आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकींच्या अडचणी वाढल्या आहेत.

COMMENTS