मोबाईल क्रमांकाप्रमाणे आता बँकेचे खातेही पोर्टेबल करता येणार आहे. बँक बदलली तरी नव्या बँकेत खाते क्रमांक कायम ठेवण्याची सुविधा लवकरच खातेधारकांना उपलब्ध होणार आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गवर्नर एसएस मुंदडा यांनी बँक अकाउंट पोर्टेबिलिटिची आवश्यकता असून लवकरच ग्राहकांना ही सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे तुम्हाला तुमचा अकाउंट नंंबर तोच ठेवून बँक बदलवता येऊ शकते.
मुंदडा यांनी म्हटलंय की, एकदा अकाउंट नंबर पोर्टेबिलिटी सुरू झाली तर सेवा न आवडलेला ग्राहक दुस-या बँकेकडे जाऊ शकतो. मोठ्या संख्येनं बँक बीसीएसबीआई द्वारा जाहीर केलेल्या आचार संहितेचं पालन करत नाही. बीसीएसबीआई हे एक स्वायत्त संस्था आहे जी रिजर्व बँक ऑफ इंडिया इंडियन बँक असोसिएशन आणि अनुसूचित कमर्शल बँके द्वारा स्थापन केलं गेलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून आधार नामांकन झालं आहे. एनपीसीआईनं प्लॅटफॉर्म तयार केला आहे. आईएमपीएस सारख्या बँकिंग व्यवहारासाठी अनेक ऍप सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अकाउंट नंबर पोर्टेबिलिटिची शक्यता बळावली आहे असं देखील मुंदडा म्हणाले.
जर भारतात बँक अकाउंट नंबर पोर्टेबिलिटी सुरू झाली तर भारत अकाउंट पोर्टेबिलिटीची सुविधा देणारा पहिला देश ठरेल. सध्या जगात कुठेही बँक अकाउंट पोर्टेबिलिटी ही सुविधा उपलब्ध नाही.
COMMENTS