शेतक-यांच्या संपात राज ठाकरेंची उडी, भाजपने शेतक-यांची फसवणूक केली !

शेतक-यांच्या संपात राज ठाकरेंची उडी, भाजपने शेतक-यांची फसवणूक केली !

मुंबई – निवडणूकपूर्वी भाजपने भरमसाठ आश्वासने दिली. मात्र आता ती पूर्ण केली जात नाहीत. भाजपने शेतक-यांची घोर फसवणूक केल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केलाय. मी शेतक-यांसोबत आहे असंही राज म्हणाले. भाजपवाल्यांकडे पैसे नाहीत. जुन्या योजनांना गोंडस नावे देऊन ते देशातील जनतेची फसवणूक करत आहेत. देशात किसान आणि जवान मरत आहेत, भाजपवाले सुस्त आहेत अशी टीकाही राज यांनी केलीय. भाजपने खोटी आश्वासन देऊन सत्ता मिळवली अशी टीकाही राज ठाकरे यांनी केलीय. शेतक-यांच्या संपाला तुमचा पाठिंबा आहे का असा प्रश्न विचारला असता माझा त्यांच्या भावनेला पाठिंबा आहे असं त्यांनी सांगितलं.

COMMENTS