मुंबई – कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. शिवसेना शेतकऱ्यांसोबत असून कर्जमाफीची घोषणा ही अर्धवट आहे. यामुळे शिवसेनेने मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीला दिवाकर रावते, सुभाष देसाई, दीपक सावंत आदी गैरहजर राहीले असून, भाजप सरकारने कर्जमाफीचा निर्णय हा शिवसेनेला विचारात न घेता घेतला आहे , असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला नाही. त्यांनी रितसर मुख्यमंत्र्यांकडे गैरहजर राहण्याची अनुमती मागितली आहे. आजच्या बैठकीत महत्वाचे विषय नसल्याने, मुख्यमंत्र्यांनीही त्यांना गैरहजर राहण्याची अनुमती दिली असल्याचं सुधीर मुनगंटीवार शिवसेना-भाजपमध्ये वाद नसल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
COMMENTS