एम एस स्वामीनाथन यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक !

एम एस स्वामीनाथन यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक !

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात प्रामुख्याने आश्वासन दिल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात अशी शेतक-यांची मागणी आहे. मोदींनी गेल्या तीन वर्षात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाहीत म्हणून त्यांच्यावर शेतकरी वर्गातून आणि विरोधकांकडून चौफेर टीका होत आहेत. त्यावर पंतप्रधान मौन बाळगून आहेत. मात्र आता खुद्द एम एस स्वामीनाथ यांनीच नरेंद्र मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. मोदीं यांच्या कृषी विषयक धोरणांचं त्यांनी कौतुक केलं आहे. शेतकरी आयोगाच्या अनेक शिफारशींची मोदी सरकारने अंमलबाजवणी केल्याचं प्रशस्तीपत्रकही स्वामीनाथन यांनी मोदी सरकारला दिलं आहे. त्यामुळे कृषी विकासाला चालना मिळाली अंसही स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. ट्विटर द्यावेर त्यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. दर्जेदार बियाणांचा पुरवठा करणे, सॉईल हेल्थ कार्ड, सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे आणि शेतक-यांचा भरभराटीसाठी योग्य उपाययोजना करणे अशा अनेक शिफारशींची मोदींनी अंमलबाजवणी केली आहे असंही स्वामीनाथन यांनी म्हटलंय. खाजगी क्षेत्र आणि कृषी विद्यापीठांच्या मदतीने ग्रामीण महिलांच्या कौशल्य वाढवण्यास प्रयत्न केल्याचंही स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू या राज्यात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केलीय.  कर्जमाफी या तातडीची आणि इतर दीर्घकालीन उपायोजना यांचा मेळ घालायला हवा असंही स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे.

COMMENTS