शेतकऱयांना दिलासा मिळणारी बातमी आहे. शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के दराने कर्ज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज 9 टक्के दराने दिले जाते. मुद्दल रक्कमेपेक्षा व्याजाचे ओझेच जास्त झाल्याने कर्जाची रक्कम वाढत जाते. मात्र एका वर्षासाठी घेतलेले कर्ज कमी दरात देण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी सरकारच्या तिजोरीवर 19 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
तसेच फक्त 3 लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱयांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, कर्जबाजारीपणा, सततची नापिकी यांसारख्या विविध कारणांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱयांना केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
COMMENTS