येत्या 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे. या जीएसटीच्या प्रमोशनसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून बिग बी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय जकात आणि सीमाशुल्क विभाग बिग बी यांची नियुक्ती ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून करणार आहे. 40 सेकंदाचा एक व्हिडिओ अर्थ मंत्रालयाने ट्वीट वर शेअर केला आहे. ‘जीएसटी- एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार’ असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलं आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ हे जीएसटीचं महत्त्व सांगताना भारताच्या तिरंग्याचा दाखला देताना दिसतात. भारताच्या झेंड्यावर असणारे तीन रंग हे आपल्याला एकत्र बांधून ठेवतात त्याचप्रमाणे, जीएसटीमुळेही एक राष्ट्र, एक कर आणि एक बाजारपेठ होणार असल्याचे ते या व्हिडिओमध्ये सांगतात.
GST – An initiative to create a unified national market. #OneNationOneTaxOneMarket pic.twitter.com/Cti76a8KUF
— Ministry of Finance (@FinMinIndia) June 19, 2017
COMMENTS