राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा पाच दिवसांचा करावा, या राज्य सरकारी-अधिकारी संघटनांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर अनुकूलता दर्शवली आहे. मुख्य सचिवांचे सामान्य प्रशासन विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे. मंत्रीमंडळासमोर जुलै महिन्यात प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यामुळे राज्यात पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी असते. पहिल्या व तिसऱ्या किंवा एखाद्या महिन्यात येणाऱ्या पाचव्या शनिवारी कार्यालये सुरू असतात. मात्र आता पाच दिवसाचा आठवडा करण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मिळाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे.
COMMENTS