भाजपच्या मंत्र्यालाच माहीत नाही ‘जीएसटी’चा फुलफॉर्म !

भाजपच्या मंत्र्यालाच माहीत नाही ‘जीएसटी’चा फुलफॉर्म !

1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे. केंद्र सरकारनेही त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात खास सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. जीएसटी म्हणचे नेमक काय हे तर सोडच मात्र तरी  भाजपचेच मंत्र्याला जीएसटीचा फुलफॉर्म  विचारला असाता त्यांना फुलफॉर्म माहिती नसल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील सामाजिक कल्याण, आदिवासी विकास मंत्री रमापती शास्त्री यांना जीएसटीचा फुलफॉर्मच माहिती नाही.

उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथे  एका कार्यक्रमात स्थानिक व्यापाऱ्यांसोबत जीएसटीसंदर्भात चर्चा करण्यासाठी रमापती शास्त्री आले होते. मात्र या कार्यक्रमात शास्त्री यांनाच नवीन करप्रणालीची माहिती नसल्याचे समोर आले. एका पत्रकारांनी रमापती शास्त्री यांना जीएसटीचा फुलफॉर्म काय असा प्रश्न विचारला. मात्र त्यांना काही फुलफॉर्म  सांगता येईना. मंत्रीमहोदयांच्या मागे गर्दीतून एका व्यक्तीने शास्त्रींना फुलफॉर्म सांगितला खरा पण शास्त्रींना त्याचे म्हणणे ऐकू गेलेच नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर शास्त्रींची चांगलीच फजिती झाली. प्रसारमाध्यमांमध्ये आपण चेष्टेचा विषय ठरु हे लक्षात आल्यावर शास्त्रींनी सारवासारव केली. मला जीएसटीचा फुलफॉर्म माहित होता पण त्यावेळी आठवतच नव्हते असे म्हणत  शास्त्रींनी वेळ मारुन नेली.

COMMENTS