निवडणूक लढविल्यास माझे डिपॉझिट जप्त होईल – अण्णा हजारे

निवडणूक लढविल्यास माझे डिपॉझिट जप्त होईल – अण्णा हजारे

राळेगणसिध्दी – जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांचे काम करण्यासाठी राजकारणात राहिलेच पाहिजे हा गैरसमज आहे. मी सामान्य जनतेच्या सहकार्याने आतापर्यंत सरकारला आठ कायदे लागू करायला भाग पाडले. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यालाही एकट्याने मागणी करून एखादा कायदा करणे शक्‍य नसते. मात्र, कोणत्याही पदावर नसताना मला ते शक्य झाले. त्यामुळे “मी जर राजकारणात आलो आणि निवडणूक लढवली, तर माझी डिपॉझिट जप्त होईल,” असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. यावरुन राजकारणात येण्याबाबत उत्सुक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशभरात विविध ठिकाणी कार्यरत असलेले लष्करी अधिकारी व जवानांनी सहकुटुंब हजारे यांची सदिच्छा भेट घेतली, वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘देशात व्यवस्थित काम करण्यासाठी केवळ राजकारणात उतरण्याची आवश्यकता नाही, उलट राजकारणापेक्षा जनसंघटन अतिशय महत्त्वाचे असून तेच कार्य मी करीत आहे. त्यामुळे मला जनतेचे प्रश्न सोडविण्यात यश आले. आपल्याकडे निवडणुका या पक्ष व चिन्हांच्या आधारे होत असल्याने बहुमतात येणाऱ्या पक्षाचीच चलती राहते. इतरांना फारसे महत्वच दिले जात नाही, त्यामुळे देशात पक्ष व चिन्हविरहित निवडणुका होतील त्याचवेळी खरी लोकशाही अस्तित्वात येईल. असेही अण्णा हजारे म्हणाले.

 

COMMENTS