राष्ट्रपतिपदाची निवडणूक 17 जुलैला होत असून या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत आता विरोधी पक्षात फूट निर्माण झाली आहे. विरोधी पक्षाचे किमान सहा आमदार क्राॅस व्होटिंग करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र यावर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार देण्यात आला आहे. दुसरीकडे अपक्ष आमदार रवी राणांनी सहा अपक्ष आमदारही कोविंद यांनाच मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्रात भाजपाकडे 122, तर शिवसेनेची 63 मते असून 6 अपक्षांनी कोविंद यांना पाठिंबा दिल्याने त्यांचाच विजय नक्की आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीचे 12 आमदार क्राॅस व्होटिंग करतील, असा दावा केला आहे. राणा हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अपक्ष आमदार असल्याचे बोलले जात असून विरोधकांमध्ये फाटाफूट करण्याबरोबरच अपेक्षांची मोठ बांधण्याची जबाबदारी राणा यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
COMMENTS