मुंबई – मंत्री होण्यासाठी अनेकजण वाट्टेल ते करायला तयार होता. जोरदार लॉबिंग करण्यापासून ते निष्ठा बदलण्यापर्यंत. पण एखादा कॅबिनेट मंत्रीच जर मला मंत्रीपदापासून मुक्त करा असं सांगत असेल तर….. होय राज्यातल्या एका कॅबिनेट मंत्र्यालाच आता मंत्रीपद नको आहे. त्याला पक्षसंघटनेत काम करायचं आहे. शिवसेनेच्या त्या मंत्र्याचं नाव आहे सुभाष देसाई.
सुभाष देसाई यांचा नुकताच 75 वा वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने काल गोरेगावमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. त्या कार्यक्रमातच देसाई यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार नव्हतो तरी मला मंत्री केले. ही मंत्री पदाची झूल किती दिवस घालायची. झूल काढली तरी चालेल, मला ही पक्ष काम करायला आवडेल अशा शब्दात मंत्रीपद काढून घ्यावे अशी विनंती केली. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे त्यांचे मंत्रीपद काढणार का याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
COMMENTS