पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापुढे सार्वजनिक कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊ नयेत, असा फर्मान केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी एखादे फूल, पुस्तक किंवा हातरूमाल द्यावे, असे गृह मंत्रालयाने सांगितले आहे. गृह मंत्रालयाकडून देशातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत कळवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींच्या अॅपचं लाँचिंग करण्यात आले होते. या अॅपवर मोदींनी पुष्पगुच्छ स्वीकारू नये, अशा सूचना लोकांकडून आल्या होत्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही लोकांकडून पुष्पगुच्छ का स्वीकारता ? तुम्ही आणि बाकीचे मंत्री पुष्पगुच्छ स्वीकारणं बंद करू शकत नाहीत का? फक्त तुम्ही जरी असं केलंत तर दीड कोटी रुपये वाचतील, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आशिष आनंद यांनी दिला होता. या पुष्पगुच्छमुळे वर्षाला 1.5 कोटींचा चुराडा होत असल्याचे आनंद यांनी सांगितले होते. यापूर्वी 17 जून रोजी पंतप्रधान मोदी यांनी जाहीर कार्यक्रमातही आपल्याला भेट म्हणून पुस्तके द्यावीत, असे आवाहन केले होते.
COMMENTS