उस्मानाबाद – जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे संपूर्ण राज्यात फिरत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांशी संवाद, शेतकरी मेळावा आदी कार्यक्रम घेतले जात आहेत. उस्मानाबाद शहरामध्ये विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाकरे यांनी आपल्या खास शैलित विविध विषयांवर मत मांडले. मी ज्या ठिकाणी जाईल तिथे लोक माझ्याकडे येत आहेत. निवेदन देत आहेत. माझ्यावर लोकांचा विश्वास आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्याची जिद्द आहे. त्यामुळेच लोक माझ्याकडून अपेक्षा ठेवत आहेत.
सध्या जिल्ह्यासह राज्यात दुष्काळ आहे. पण, उस्मानाबाद जिल्ह्यात येताच पाऊस सुरू होतोय. हा माझा पायगुन असावा. पण, अशा गोष्टी मी मानत नाही. जर
तसे असेल तर शेतकऱ्यांसाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पायी चालेल, अन पाऊस पाडून दाखवेन असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. यावेळी जलसंधारणमंत्री प्रा. डॅ. तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजीमंत्री सचीन अहीर, सहसंर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, प्रा. गौतम लटके, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबा पाटील, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे आदी यावेळी उपस्थित होते.
COMMENTS