मुंबईतील काँग्रेसचे विद्यमान आमदार शिवसेना-भाजपच्या वाटेवर ?,  मुलाखतीकडे फिरवली पाठ!

मुंबईतील काँग्रेसचे विद्यमान आमदार शिवसेना-भाजपच्या वाटेवर ?, मुलाखतीकडे फिरवली पाठ!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मुंबईतील इच्छुक नेत्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. परंतु उमेदवारीच्या या मुलाखतीकडे मुंबईतील अनेक नेत्यांनी पाठ फिरवली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून मुलाखतीकडे पाठ फिरवणारे नेते शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. परंतु विद्यमान आमदारांना मुलाखतीसाठी येण्याची गरज नसल्याचा खुलासा काँग्रेसनं केला आहे.

दरम्यान आमदार वर्षा गायकवाड, अमिन पटेल, कृपाशंकर सिंह, मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी मुलाखतीकडे पाठ फिरवली आहे. वेगवेगळी कारणे देत या नेत्यांनी मुलाखतींकडे पाठ फिरवली असून कृपाशंकर सिंह यांनी कलिना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत अर्जही केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मालाडचे आमदार असलम शेख हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावरून काँग्रेस पक्षात आता चिंतेचं वातावरण पहायला मिळत आहे.

COMMENTS