मुंबई – शिवसेना भाजपमध्ये तू तू मै मै सुरूच आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. गुजरातच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं जीएसटी कमी केला आहे. भाजपचा हा निर्णय लोकांना जीएसटीचा त्रास होतोय म्हणून नाही तर गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला त्रास होतोय म्हणून घेतला आहे अशी बोचरी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे राष्ट्र प्रथम या भाजपच्या धोरणाचा बुऱखा फाटल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
गुजरातमध्ये शिवसेना स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. दोनच दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. पंतप्रधानांसह केंद्रातले सर्वच मंत्री गुजरातमध्ये प्रचारात व्यस्त असतील तर देश कोण चालवणार असं आदित्य यांनी ट्विटरद्वारे म्हटलं होतं. त्यावर आशिष शेलार यांनी त्यांना प्रत्युत्तरही दिलं होतं. आता पुन्हा एका आदित्य यांनी भाजपला डिवचलं आहे. आता भाजप यावर काय उत्तर देतं ते पहावं लागेल.
COMMENTS