‘राज्यात लवकरच प्लॅस्टीकवर बंदी’

‘राज्यात लवकरच प्लॅस्टीकवर बंदी’

मुंबई – पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. त्यासाठी पर्यावरणाचं संरक्षण करण हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्लॅस्टीकच्या कॅरीबॅगमुळे पर्यावरणाचा ह्रास होत आहे. त्यासाठी प्रत्येकानंच प्लॅस्टिकाच्या कॅरीबॅगचा वापर टाळणं गरजेचं असून राज्यात लवकरच प्लॅस्टीकवर बंदी आणणार असल्याचं वक्तव्य राज्यपाल सी विद्यासागरराव यांनी केलं आहे.

मुंबईतील एसआयईएस हायस्कूलमध्ये पृथ्वीचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. याचं उद्घाटन राज्यपाल सी विद्यासागरराव यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी या प्रदर्शनाची पाहणी देखील केली. यादरम्यान बोलत असताना त्यांनी पर्यावरणाचा होत असलेला ह्रास टाळणं गरजेचं असल्याचं म्हटलं. त्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकानं पाऊल उचलून पृथ्वीचा होत असलेला ह्रास टाळण्याचं आवाहन देखील राज्यपाल यांनी केलं. राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात लवकरच प्लॅस्टीकवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS