“गारपीटग्रस्त शेतक-यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक !”

“गारपीटग्रस्त शेतक-यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक !”

मुंबई –  गारपीटग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीसाठी हवालदिल झाला आहे. नुकासान झालं आहे परंतु अनेक ठिकाणचे पंचनामे बाकी असल्यामुळे ते कधी होणार याची आतुरतेने शेतकरी वाट पाहत आहेत. तर दुस-या बाजूला ज्या शेतक-यांच्या शेतात पंचनामे केले जात आहेत. त्या शेतक-यांना प्रशासनाकडून गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात आहे. ज्या शेतक-यांच्या शेतात पंचनामा केला जात आहे, त्या शेतक-यांना त्या पिकात उभा करुन त्यांच्या हातात गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्या नावाची पाटी देवून त्यांचा फोटो काढला जात आहे. सरकार या शेतक-यांना गुन्हेगार समजतंय काय असा सवाल  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

 

दरम्यान चव्हाण यांनी ट्वीट करुन प्रशासनाने काढलेले शेतक-यांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच या ट्वीटमध्ये त्यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात त्याप्रमाणे शेतक-यांच्या हातात नावाच्या पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत. गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का?  सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल आता चव्हाणांनी केला आहे.

COMMENTS