अहमदनगर – अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना जोरदार धक्का बसला असून भाजपचे सुजय विखे हे मोठ्या आघाडीवर आहेत. सुजय विखे तब्बल 1 लाख मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून सुजय विखे आघाडीवर आहेत. त्यांनी सातत्यपूर्ण आघाडी घेत आपली पकड मजबूत केली ठेवली असल्यामुळे राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना हे लीड तोडणं अवघड जाणार असल्याचं बोललं जातं आहे.
दरम्यान अहमदनगर लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीत राषट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आणि राधाकृष्ण विखेंनी नगरची जागा अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
कोणत्या मतदारसंघातून कोण आघाडीवर ?
मुंबई उत्तर मतदारसंघातून ऊर्मिला मातोंडकर पिछाडीवर, गोपाळ शेट्टी आघाडीवर
गिरीष बापट आघाडीवर
पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे गिरीष बापट आघाडीवर
साताऱ्यात उदयनराजे भोसले आघाडीवर
शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आघाडीवर
बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर
रायगड – राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आघाडीवर
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून शिवसेना उमेदवार विनायक राऊत एक हजार मतांनी आघाडीवर, नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठची लढत
नांदेडसह दोन जागांवर काँग्रेसला आघाडी
कोल्हापुरसह दोन जागांवर शिवसेना आघाडीवर
COMMENTS