मावळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, पार्थ पवार पिछाडीवर, श्रीरंग बारणे मोठ्या आघाडीवर  !

मावळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, पार्थ पवार पिछाडीवर, श्रीरंग बारणे मोठ्या आघाडीवर !

पुणे – मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. पार्थ पवार हे जवळपास दीड लाख मतांनी मागे पडले आहेत. तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मोठ्या आघाडीवर आहेत.

दरम्यान मावळ मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांना कडवी लढत दिली होती. मुलाच्या विजयासाठी अजित पवार हे मावळमध्ये ठाण मांडून बसले होते. शेतकरी कामगार पक्षानंही राष्ट्रवादीला मदतीचा हात दिला होता. मात्र, या कशाचाही फायदा राष्ट्रवादीला झाल्याचं दिसत नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार पार्थ पवार हे जवळपास दीड लाख मतांनी मागे पडले आहेत. तर शिवसेनेचे
श्रीरंग बारणे हे मोठ्या आघाडीवर आहेत. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS