नगरमध्ये शिवसेनेला धक्का, पाच नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश !

नगरमध्ये शिवसेनेला धक्का, पाच नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश !

बारामती – अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून पारनेर शिवसेनेचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या 5 नगरसेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. नगरसेवक मुदस्सर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी आणि नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत पिरवेश केला आहे.

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज बारामतीत येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पारनेर तालुक्यातील शिवसेनेमधून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना बरोबर आणत थेट राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला.

पारनेर नगरपंचायतीच्या नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सर्वांच्या प्रवेशाने पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे वजन वाढले आहे. विशेष म्हणजे पारनेर नगरपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादीचेच सत्तेसाठी जुगाड होते, असे असताना पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यामागचे नेमके राजकारण हे शिवसेनेंतर्गत नाराजी की, आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्यातील शीतयुध्द हे येत्या काळात पहावयास मिळणार आहे.

COMMENTS