राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांची कार्यकर्ता मेळाव्यात मोठी घोषणा !

राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांची कार्यकर्ता मेळाव्यात मोठी घोषणा !

अहमदनगर – राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात मोठी घोषणा केली आहे. पिचड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. आयुष्यात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. कटू निर्णय असला तरी तो घ्यायची वेळ आली असल्याचं पिचड यांनी यावेळी म्हटलं आहे. शरद पवारांच्या माध्यमातून मतदारसंघाचा मोठा विकास झाला. खांद्याला खांदा लावून काम केलं. लोकसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला 32 हजाराचं मताधिक्य दिलं.विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना विकास कामाला खिळ बसली असून मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते भाजपमध्ये जाऊन सेडवणार असल्याचं पिचड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आपणच सत्ताधारी पक्षात जावं ही जनतेची मागणी असून पवारांचे उपकार मी कधीही फेडू शकत नाही. पुन्हा आघाडीची सत्ता येणार नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्तेत असणं गरजेचं आहे. हा निर्णय घेणं खुप अवघड होतं. जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी मनावर दगड ठेवून हा निर्णय असल्याचं पिचड यांनी म्हटलं आहे.

तसेच मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा वैभव पिचड यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली आहे. आजवर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दिलेला सन्मान कधीही विसरू शकणार नाही. विकासाची गंगा मतदारसंघात आणण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचंही पिचड यांनी म्हटलं आहे.

COMMENTS