‘या’ जागेच्या बदल्यात नगरची जागा द्या, काँग्रेसचा राष्ट्रवादीकडे प्रस्ताव ?

‘या’ जागेच्या बदल्यात नगरची जागा द्या, काँग्रेसचा राष्ट्रवादीकडे प्रस्ताव ?

मुंबई – काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीतील अहमदनगर लोकसभेच्या जागेचा तिढा सुटता सुटत नसल्याचं दिसत आहे. या जागेवरुन आता काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे नवा प्रस्ताव दिला असल्याची माहिती आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगरच्या बदल्यात औरंगाबादची जागा घ्या असा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादीला दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या प्रस्तावावर राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगरच्या जागेवरुनच लोकसभा निवडणूक लढवायची आहे. तर औरंगाबादच्या जागेसाठी राष्ट्रवादी उत्सुक आहे. त्यामुळे औरंगाबादची जागा हवी असेल तर अहमदनगरची जागा सोडा असा प्रस्ताव काँग्रेसनंं राष्ट्रवादीला दिला असल्याची माहिती आहे.

COMMENTS