अहमदनगर – अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या आधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे तब्बल चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.यामध्ये भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी याचे पुत्र सुवेद्र गांधी आणि त्यांच्या सून दीप्ती सुवेद्र गांधी यांचे अर्ज बाद झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे यांनी शुक्रवारी पहाटे 2.30 वाजता हा निकाल दिला. एवढ्या रात्री निकाल देण्याची घटना महापालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच घडली आहे.
सुवेद्र गाधी यांनी प्रभाग क्रमांक 11मधून अर्ज दाखल केला होता, तर त्यांच्या पत्नी दीप्ती गांधी यांनी प्रभाग 12मधून अर्ज दाखल केला होता. दोघांच्या अर्जावर अनुक्रमे गिरिश जाधव व संभाजी कदम यांनी आक्षेप घेतला होता. दुपारी सुनावणी झाल्यानंतर या अर्जावरील निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आज पहाटे 2.30 वाजता दोघांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत.
दरम्यान शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांचाही अर्ज बाद झाल्याने तब्बल सहा वेळा नगरसेवक झालेल्या बोराटे यांना मोठा झटका बसला आहे.त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार योगेश चिपाडे यांचाही अर्ज बाद करण्यात आला असल्याची माहती आहे.
यांचे अर्ज बाद
विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे (शिवसेना)
योगेश चिपाडे (राष्ट्रवादी)
खासदार पुत्र सुवेंद्र गांधी (भाजपा)
खाससदारांच्या सून दीप्ती गांधी (भाजप)
सुरेश खरपुडे (भाजपा)
प्रदिप परदेशी (भाजपा)
COMMENTS