राहुल गांधींची काँग्रेस नेत्यांना तंबी !

राहुल गांधींची काँग्रेस नेत्यांना तंबी !

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना तंबी दिली आहे. काँग्रेस नेत्यांनी कुणाच्या भावना दुखावतील असं विधान करु नये असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. राजस्थानमधील काँग्रेस नेते सी पी जोशी यांन वादग्रस्त विधान केलं होतं. उमा भारती लोधी समाजाच्या आहेत आणि त्या हिंदू धर्मावर भाष्य करतात, मोदींचा धर्म कोणता?, असा सवाल त्यांनी विचारला होता. ऋतंभरा यांची जात कोणाला माहित आहे का?, या देशात धर्माबद्दलची माहिती फक्त ब्राह्मणांनाच आहे, असं वक्तव्य जोशी यांनी केलं होतं.

दरम्यान या ‘सी पी जोशी यांच्या या विधानावरुन राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना तंबी दिली आहे.  सी पी जोशी यांचे विधान हे काँग्रेस पक्षाच्या आदर्शांविरोधात आहे. पक्षाच्या नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे विधान करु नये’, काँग्रेसच्या विचारसरणीचा आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करुन जोशी यांना त्यांची चूक लक्षात येईल, त्यांनी या विधानासाठी खेद व्यक्त करावा असंही या ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS