बारामती – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीत शिवसेनेचे चार आमदार… हे टायटल वाचून तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की चार आमदार अजित दादांच्या गळाला लागले की काय ? पण तसं काही नाही.
त्याचं झालं असं पुणे जिल्ह्यात इंदापुर तालुक्यामध्ये एका आधुनिक डेअरीचं उद्घाटन होतं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विविध पक्षाचे आमदार उपस्थित होते. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, दत्तात्र्येय भरणे, काँग्रेसचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह शिवसेनेचे चार आमदार उपस्थित होते. चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, राजापूरचे आमदार राजन साळवी, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि खानापूर विट्याचे आमदार अनिल बाबर उपस्थित होते. डेअरीचे मालक अर्जुन देसाई यांचे निकटचे संबंध असल्याने हे आमदार या कार्यक्रमला आले होते.
कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे येणार होते. पण दोन्हीही नेते वेळेवर आले नाहीत. नेहमीप्रमाणे अजित दादा कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर आले. सर्व आमदारही वेळेवर आले. तेंव्हा रिकाम्या वेळेत काय करायचे म्हणून अजित दादांनी त्यांच्या गाडीतून डेअरीचा परिसर शिवसेनेच्या आमदारांना दाखवला. या पाहणी दौ-यात चर्चा काय झाली हे मात्र अजित पवार आणि त्या आमदारांनाच माहिती….
COMMENTS