गुजरातमध्ये भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील 50 जादुगार !

गुजरातमध्ये भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील 50 जादुगार !

गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षांना कंबर कसली आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांना आकर्षत करण्यासाठी प्रचारात वेगवेगळे फंडे वापरताना दिसतात. यावेळी भाजपने गुजरात निवडणुकीसाठी विकासाच्या मुद्दयावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप निवडणुकीच्या प्रचारात जादूगारांना उतरवणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून भाजप पन्नासहून अधिक जादुगारांना बोलवणार आहे. हे जादूगार जादूच्या माध्यमातून मतदारांना विकासाबाबत माहिती देणार आहेत. यावेळी गावात होणा-या सभांमध्ये जादूचे प्रयोग दाखवण्यात येणार आहेत. दैनिक भास्कर या वृत्तपत्रानं हे वृत्त दिलं आहे.
नागपूरच्या 50 जादूगारांना विकासाच्या मुद्द्यावर शो करण्याची जबाबदारी सोपवली आसून.  भाजपच्या बैठकीत नागपूरहून आलेले जादूगर एस लाल यांनी सांगितले की, आम्ही विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात जादू दाखवणार आहेत. भाजप सांगेल त्या प्रकारचाच खेळ दाखवला जाणार आहे. विकास हीच मुख्य थीम असणार आहे. त्यात हातांवर कमळ उगवलेले दाखवले जाईल. विकास कशाला म्हणतात हे दाखवून भाजपला मत देण्याचा खेळही दाखवला जाईल. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये खेळ दाखवल्यानंतर 8 दिसेंबरपासून ते मध्य गुजरातमध्ये शो सुरू करतील. पंतप्रधान मोदींसह इतर मोठ्या नेत्यांच्या सभा ज्याठिकाणी होतील, त्याठिकाणी हे खास शो होणार आहेत. प्रचारासाठीचा हा ‘जादू’ चा फंडा भाजपसाठी किती फायदेशीर ठरेल हे निवडणुक निकलानंतर स्पष्ट होईल.

COMMENTS