…तर मी राजकारणातून निवृत्ती घेणार – अजित पवार

…तर मी राजकारणातून निवृत्ती घेणार – अजित पवार

पुणे – आज लोकसभेसाठी तिसय्रा टप्प्यात 14 मतदारसंघासाठी मतदान घेतलं जात आहे. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

बारामतीमध्ये युतीच्या कांचन कुल तर आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे.
बारामती भाजपचा विजय झाल्यास आपण राजकारणामधून निवृत्ती घेऊ असं वक्तव्य माजी उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. बारामतीच्या काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केल्यानंतर अजित पवार बोलत होते.

दरम्यान आपण बारामतीचा गड १०० टक्के राखणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. बारामती भाजपने जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन पण भाजपला बारामती जिंकता आली नाही तर त्यांनी निवृत्ती घ्यावी’ असं आव्हानही अजित पवरांनी केलं आहे.

COMMENTS