राज ठाकरेंच्या सभांचा फायदा होणार का?, अजित पवार यांची प्रतिक्रिया!

राज ठाकरेंच्या सभांचा फायदा होणार का?, अजित पवार यांची प्रतिक्रिया!

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारविरोधात राज्यात सभा घेतल्या. या सभांचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार  यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या सभांमुळे चांगला प्रभाव पडणार असून जनतेचा मोदींवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे मोदींच्या सभेला गर्दी जमवावी लागते अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी आज बारामतीत मतदान केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

दरम्यान भाजपाची लोकं फक्त निवडणुकीत येतात. महादेव जानकर यांना गेल्या निवडणुकीत बारामतीतून चांगली मते मिळाली होती. पण निवडणुकीनंतर ते या मतदारसंघात एकदाही फिरकले नाही. पण आम्ही १२ महिने जनतेसोबत असतो त्यामुळे जनता आमच्या पाठिशी असल्याचंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS