‘माझी चुक झाली होती, पण बोलताना तोलून-मापून बोला’ अजित पवारांचा भाजप नेत्यांना सल्ला!

‘माझी चुक झाली होती, पण बोलताना तोलून-मापून बोला’ अजित पवारांचा भाजप नेत्यांना सल्ला!

पुणे –  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘मला सगळ्यांची अंडीपिल्ली माहित आहेत’ ‘भाजपमधील नेते मुलींना पळून नेण्याची भाषा करतात, शेतकऱ्यांना साले म्हणातात अशा नेत्यांनी बोलताना आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ‘माझी चुक झाली. त्याबद्दल मी माफी मागितली आहे. पण बोलताना तोलून-मापून बोला’ असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यातील जाहीर सभेत बोलत होते.

दरम्यान ‘जे लोक भाजपमध्ये गेले ते कशासाठी गेले, हे मी नाव घेऊन सांगेन असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच ‘काँग्रेसने दिलेले उमेदवार मोहन जोशी यांच्या मागे आम्ही सगळे ताकदीनं उभे आहोत’ असंही पवार यांनी म्हॉलं आहे. बारामती लोकसभा आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी अर्ज भरला.  यावेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं कौतूक केलं. ‘देशात एक नंबरचं काम सुप्रियाचं’ असं अजित पवार म्हणाले आहेत.

COMMENTS