राहुल गांधींच्या ‘त्या’ फोटोवरुन सोनिया गांधी नाराज!

राहुल गांधींच्या ‘त्या’ फोटोवरुन सोनिया गांधी नाराज!

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका फोटवरुन सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने काल जाहीरनाम्याचे प्रकाशन केले.या जाहीरनाम्याच्या मुख्यपृष्ठाचे पान काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना आवडले नसल्याची माहिती आहे. जाहीरनामा प्रकाशनासाठी मंचावर जाण्याआधी सोनिया गांधींनी काँग्रेस नेते राजीव गौडा यांच्याकडे आपली नाराजी बोलून दाखवली असल्याची माहिती आहे.

दरम्यान काँग्रेस जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर मोठया गर्दीचा फोटो असून राहुल गांधी आणि काँग्रेसचे निवडणूक चिन्ह तळाला दाखवले आहे. मुख्यपृष्ठाची ही डिझाईन सोनियांना आवडली नसल्याची बातमी  इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. यामध्ये मंचावर जाण्याआधी राजीव गौडा सोनिया गांधींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण सोनिया गांधींना त्यांचे मुद्दे पटले नसल्याचे हावभावावरुन दिसले असल्याचे इंडिया टुडेने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

COMMENTS