मराठवाड्याच्या दुष्काळावर बोलत नाहीत, स्वप्न मात्र जोरात पाहतात – अजित पवार

मराठवाड्याच्या दुष्काळावर बोलत नाहीत, स्वप्न मात्र जोरात पाहतात – अजित पवार

औरंगाबाद – आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं संविधान बचाव मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र लातूरमध्ये बोलतात 2019 ला मुख्यमंत्री मीच होणार, अजून किती स्वप्न पाहणार हे लोक, मराठवाड्याच्या दुष्काळावर बोलत नाहीत स्वप्न मात्र जोरात पाहतात अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. तसेच मराठवाड्यात ताबडतोब दुष्काळ जाहीर करावा, आणि शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान पवार साहेब दिल्लीमध्ये असताना त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली, हे सरकार मात्र काही करायच्या मानसिकतेत दिसत नाही. आज काही व्यापारी मला भेटले, म्हणे मोदींना पाठिंबा दिला आमचं चुकलं. कारखाने बंद होतायत मात्र सरकारचं लक्ष नाही. आम्ही सुभेदारीमध्ये गेलो अराम करायला, तर तिथे वीज नाही, म्हणे भारनियमन सुरू झालं. आम्ही बंद केलेलं भारनियमन यांनी सुरू केलं, कोळसा संपला सरकार काय झोपा काढतंय का ? असा सवालही यावेळी अजित पवार यांनी केला आहे.

तसेच सगळ्यांवर याचा परिणाम होणार मात्र सरकारवर परिणाम होणार नसल्याचं दिसत आहे. मधू चव्हाणवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. राम कदम मुलीला पळवण्याची भाषा करतो हात तर लाव बघ तुझी काय अवस्था करतो ते. शिवसेना आणि भाजप दोघेही सारखेच, नुसतेच म्हणतात नालायक सरकार आणि मांडीला मांडी लावून बसतात. भाजप नेते जाहीर म्हणतात आम्ही संविधान बदलणार आहे,  धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकणार आहोत, का तुम्हाला ते टोचतं का ? असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

मनू श्रेष्ठ आहे म्ह्णून सांगतात, काय म्हणावं यांना, संविधान वाचवायला लढावं लागणार आहे आणि या माध्यमातून हे सरकार आपण उलथवून लावूया असा इशाराही यावेळी अजित पवार यांनी सरकारला दिला आहे.

 

COMMENTS