नागपूर – हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर रविवारी सुटी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली तरच 23 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होत आहे. त्यानंतर शरद पवार औरंगाबादला जाणार आहेत. त्यांचा शरद पवार यांनी प्रेस क्लबमध्ये बुधवारी आमदारांची बैठक घेतली होती. त्यात अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारात संदर्भात निर्णय होईल, असं सांगितलं. काँग्रसेचे नेते मल्लिकार्जून खरगे यांच्याविषयी काही माहिती नाही. पण, अधिवेशन संपल्यानंतर रविवारी सुटी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली तरच 23 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असं अजित पवार म्हणाले आहेत.
COMMENTS