चारही मुंड्या चितपट केलं नाही तर नाव नाही सांगणार -अजित पवार

चारही मुंड्या चितपट केलं नाही तर नाव नाही सांगणार -अजित पवार

पुणे – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार आक्रमक झाले आहेत. ‘फुकटचे सल्ले देण्यापेक्षा चंद्रकात पाटलांनी हिंमत असेल तर शरद पवारांविरोधात माढ्यातून निवडणूक लढवून दाखवावी, चारही मुंड्या चितपट केलं नाहीतर नाव  सांगणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या वयाचा विचार करता निवडणूक लढवू नये, त्यांचा पराभव होणार आहे,’ असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी ‘फुकटचे सल्ले देण्यापेक्षा चंद्रकात पाटलांनी हिंमत असेल तर शरद पवारांविरोधात माढ्यातून निवडणूक लढवून दाखवावी, चारही मुंड्या चितपट केलं नाहीतर नाव  सांगणार नाही असं म्हटलं आहे.

COMMENTS