आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार?, याबाबत आमचंही ठरलंय – अजित पवार

आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार?, याबाबत आमचंही ठरलंय – अजित पवार

मुंबई – लोकशाही टिकून राहावी आणि लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केली आहे. ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक फेरफार केली जाते अशी नागरिकांच्या मनात शंका आहे. जगातल्या प्रगत देशांमध्ये निवडणुका बॅलेट पेपरवरतीच घेतल्या जातात याची आठवण अजितदादा पवार यांनी निवडणूक आयोगाला करुन दिली आहे.

१) इव्हिएम बाबत अजित पवारांचं मीडियवर खापर

मीडियाने ईव्हीएमबाबत शरद पवार यांचं मत वेगळं, अजित पवार यांचे मत वेगळं, सुप्रिया सुळे यांचं मत वेगळं असं पसरवून संभ्रम निर्माण केला. मात्र लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोकांचं मत काय ते महत्वाचं असतं माझं ही मत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात असच आहे.

२) मुख्यमंत्री कोण ते निकालानंतर

288 पैकी 145 आमदार निवडून आल्यावर ज्या त्या पक्षाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण तो ठरवावा. शिवसेनेचे आदित्य ठाकरे असतील का कोण हा त्यांचा प्रश्न आहे, मी त्यात नाक खुपसणार नाही.

३) चंद्रकांत पाटील ज्येष्ठ मंत्री आहेत. भाजप मध्ये क्रमांक 2 चे नेते आहेत. त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. अजून छगन भुजबळ ,अजित पवार यांना कुठं भाजपमध्ये घेतलय अस ते म्हणत असतील तर आणखी कोणी म्हणेल आम्ही चंद्रकांत पाटील यांना घेऊ म्हणून, निवडणूक शेवटी जिंकण्यासाठी लढवायची असते. त्यामुळं जर एखाद्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा ताकदवान उमेदवार असेल तर आम्ही पण त्याचा विचार करू.

४) आमचंही ठरलय.
जसं फडणवीस आणि ठाकरे यांचं मुख्यमंत्री कोण हे ठरलंय, तसं आमचंही ठरलंय. निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा मुख्यमंत्री असेल असं आमचं ठरलं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS