मुंबई – काँग्रेसचे जेष्ठ नेते डी. वाय. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशावरुन तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच डी. वाय. पाटील यांना अंधारात ठेवून राष्ट्रवादीच्या पक्ष सदस्यत्वाच्या फॉर्मवर सह्या घेतल्या असा आरोप एका पत्रकारानं केला असल्याची माहिती आहे. परंतु हा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी फेटाळून लावला आहे. तसेच एखाद्या पत्रकाराने मांडलेल्या या मताऐवजी डी. वाय. पाटील यांच्या मुलाने हा आरोप केला असता तर हे प्रकरण गंभीर ठरले असते असं अजित पवार यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात शरद पवारांवर खेळी खेळल्याचा जो आरोप करण्यात आला आहे त्यात काहीही तथ्य नाही. काँग्रेसचे जेष्ठ नेते खा. अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत पाटील यांचा जाहिरपणे पक्षात प्रवेश झाला आहे. मुळात डी. वाय. पाटील हे जेष्ठ नेते आहेत, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आहेत, राज्यपाल राहिलेले आहेत ते खासदारही होते. त्यामुळे त्यांना अंधारात ठेवून असे उद्योग एखादा नेता किंवा पक्ष कसा करु शकेल असा सवालही यावेळी अजित पवार यांनी केला आहे.असे काही घडलेले नसून लोकशाहीत पत्रकारांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रकरणी मी किंवा पक्षाने गांभीर्य दाखवण्याची गरज नसल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS