एकनाथ खडसे भाजप सोडणार, ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चेला  उधाण!

एकनाथ खडसे भाजप सोडणार, ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चेला उधाण!

भुसावळ – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजप सोडणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कोणावरही तो एकापक्षामध्ये कायम राहणार असा शिक्का नसतो. त्यामुळे कोणीही गृहित धरु नये असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. भुसावळ येथे लेवा पाटील समाजाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे खडसे पुन्हा भाजप सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही. आयुष्याच्या संघर्षात राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. माझा पक्ष असो किंवा पाटील यांचा (काँग्रेस) कोणीही कायमस्वरुपी एकाच पक्षात राहणार असा कोणावरही शिक्का मारलेला नसतो. कोणीही असा अंदाज लावू नये किंवा तसे गृहित धरु नये असे यावळी एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

या कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटीलही उपस्थित होते.यावेळी उल्हास पाटील यांनी खडसेंना पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले. आतापर्यंत भाजपामध्ये तुमच्यावर बराच अन्याय झाला आहे. त्यामुळे तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करा असे उल्हास पाटील म्हणाले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आधीच खडसेंना काँग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे खडसे काँग्रेसमध्ये जातील अशीही चर्चा सुरु आहे.

COMMENTS