मोपलवारांना एक न्याय आणि खडसेंना दुसरा न्याय का? अजित पवारांचा सवाल!

मोपलवारांना एक न्याय आणि खडसेंना दुसरा न्याय का? अजित पवारांचा सवाल!

जळगाव – सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावरील आरोपांची चौकशी करुन त्यांना परत त्याच पदावर घेतलं जातं परंतु एकनाथ खडसे यांची तातडीने चौकशी न करता त्यांचं प्रकरण तसंच रखडत ठेवलं जात आहे. त्यामुळे मोपलवारांना एक न्याय आणि एकनाथ खडसेंना दुसरा न्याय का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय गौरव सोहळ्यात ते बोलत होते.

दरम्यान राधेश्याम मोपलवार यांची समृध्दीमधील चौकशी पाच महिन्यात पूर्ण करुन त्यांना क्लीनचीट देण्यात आली. त्यानंतर लगेच त्यांना पूर्वी होते त्याच पदावर घेण्यात आलं. मग एकनाथ खडसे यांच्या भोसरी भूखंड प्रकरणातील चौकशीला एवढा वेळ का लागत आहे. तसेच मोपलवार यांना एक न्याय आणि एकनाथ खडसे यांना दुसरा न्याय का? असा सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

COMMENTS