मुंबईत “या”ठिकाणी पाकिस्तानविरोधात आंदोलन करु नका, मनसे नेते बाळा नांदगावकर यांना पोलिसांची नोटीस!

मुंबईत “या”ठिकाणी पाकिस्तानविरोधात आंदोलन करु नका, मनसे नेते बाळा नांदगावकर यांना पोलिसांची नोटीस!

मुंबई – पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्निला योग्य वागणूक न दिल्यामुळे देशभरातून पाकिस्तानचा निषेध केला जात आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील पाकिस्तानविरोधात निषेध मोर्चांच शुक्रवारी आयोजन केलं आहे. परंतु या मोर्चाला पोलिसांनी विरोध दर्शवला असून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना एल टी मार्ग पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मनसेच्या निषेध मोर्चाला उपस्थित राहिल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं या नोटीसिमध्ये बजावण्यात आलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे. लोकमान्य टिळक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा मोर्चा होणार असल्यामुळे या पोलीस ठाण्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद नाईक यांनी बाळा नांदगावकर यांना नोटीस बजावली आहे. लोकमान्य टिळक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोर्चा काढण्यास परवानगी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार दक्षिण मुंबईत आझाद मैदान वगळता कोणत्याही ठिकाणी मोर्चा अथवा रॅली काढण्यास परवानगी नाही. त्यामुळे तुम्हाला निषेध मोर्चा काढायचा असेल तर आझाद मैदानावर काढा. अन्यथा तुम्ही जर हा मोर्चा एलटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काढला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

COMMENTS